AEjuice

UPSC ची तयारी

 UPSC ची तयारी


Special Story | बारावीनंतर UPSC ची तयारी कशी करावी, पाहा

अधिकारी कोणाला होऊ वाटत, प्रत्येकालाच आयएएस होण्याची इच्छा असते मात्र, जे मेहनत, कष्ट आणि ज्यांच्यात जिद्द असते असेच लोक आयएएस होतात. आपल्या देशात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)च्यामार्फत आयएएस होण्यासाठी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा लाखो विद्यार्थी देण्यासाठी अभ्यास करतात मात्र, खूपच कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळवता येते. यूपीएससी ही आपल्या देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. दरवर्षी लाखो तरुण केवळ काही जागांसाठी या परीक्षेची तयारी करतात.

या परीक्षेत यशाची टक्केवारी खूपच कमी आहे. सिव्हिल सर्व्हिस परीक्षा तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही त्याचा निर्णय सर्वप्रथम 12 मध्ये असतानाच घ्या म्हणजे बारावीनंतर पदवीचे शिक्षण घेताना तीन वर्ष तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळेल. एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास करून या परीक्षेची तयारी सुरू करा. त्याशिवाय सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याकडे ठेवा आणि त्यानुसार तयारी करा.

बहुतेक विद्यार्थी त्यांच्या पदवीच्या कोणत्याही एका विषयातून परीक्षेच्या मुख्य टप्प्यासाठी विषय निवडतात. हे आपल्याला सुलभ करते कारण आपण संपूर्ण तीन वर्ष पदवीसह या विषयाचा अभ्यास करतो. याशिवाय इतर निवडक विषयांसाठी तुम्ही स्टडी मटेरियल निवडू शकता किंवा तुम्हाला तज्ञांचा सल्ला मिळू शकेल. चालू घडामोडींच्या तयारीसाठी तुम्ही वर्तमानपत्र आणि बातम्या नियमीत बघितल्या पाहिजेत.

एनसीईआरटी आणि एनआयओएसची पुस्तके वाचू शकता, ही पुस्तके विनामूल्य उपलब्ध आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत या विषयाचा अभ्यास करणे सर्वात महत्त्वाचे आहे, म्हणूनच हा विषय निवडताना तुम्हाला त्या विषयात रस आहे की नाही हे लक्षात ठेवा. जरी कोणत्याही विषयाचा अभ्यास करणे अशक्य नाही, परंतु तरीही ज्या विषयात आपल्याला रस आहे त्या विषयांची निवड करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. यूपीएससी परीक्षेच्या मोठ्या अभ्यासक्रमामुळे वर्षभर अभ्यास करावा लागतो. म्हणून, वेळापत्रक तयार करून वर्षभर अभ्यास करणे आवश्यक आहे.

यूपीएससी परीक्षेत यश मिळविण्यासाठी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. कारण सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही बँकिंग किंवा एसएससी परीक्षा नसते ज्यात यश लगेचच मिळते. तर या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, त्याशिवाय या परीक्षेत तुम्ही यश मिळू शकत नाहीत. यूपीएससी परीक्षेली तुम्हाला दोन ते तीन वर्षे द्यायची आहेत. या वर्षांमध्ये आपल्याला दररोज नियमित अभ्यास करावा लागतो.

बरेच लोक म्हणतात की, यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला जाणे आवश्यक आहे मात्र, हे खरंच गरजेच आहे का हे आपण बघणार आहोत. यूपीएससी परीक्षेची तयारी आपण घरी बसूनही करू शकतो. फक्त आपल्याला जीवनात काही बदल करावे लागतील योग्य अभ्यासाच्या साहित्यासह घरातून सिव्हील सर्व्हिसेसची परीक्षा देखील पास करू शकता. आपल्या शहरात राहून देखील यूपीएससीचा अभ्यास करू शकता. तुम्हाला वाट असेल की, तुम्ही फक्त घरी बसून अभ्यास करत परीक्षेची पूर्ण तयारी करू शकत नाहीत मग अशावेळी तुम्ही कोचिंग क्लासेल लावा.

आपल्याला लेखनाबरोबरच वाचनाचा सराव करावा लागेल कारण पूर्व परीक्षा घेतल्यानंतर आपल्याला ज्या मेन लिहायच्या आहे त्या टेस्टची परीक्षा घ्यावी लागेल. सुमारे 200 शब्दांत कोणत्याही विषयावर थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. आपण जितके अधिक लिहायचा प्रयत्न कराल तितकी आपली लेखन शैली सुधारेल आणि व्याकरणात कमी चुका होतील.

UPSC Preparation: यूपीएससीची तयारी कधीपासून सुरु करायला हवी? जाणून घ्या योग्य वेळ

देशभरातून लाखो तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील ठराविक जण यशस्वी होतात. तर काही मोजक्या गुणांमुळे मागे राहतात. अशावेळी यूपीएससी परीक्षांची तयारी करण्याची नेमकी वेळ कोणती असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारला जातो. काही विद्यार्थी वयाच्या २५ व्या वर्षापासून याची तयारी करू लागतात, तर काही मुले शाळेच्या वेळेपासूनच याची तयारी सुरू करतात. यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया.

शालेय विद्यार्थ्यांसाठी टिप्स

शाळेत शिकणारे विद्यार्थी भविष्यात यूपीएससीची परीक्षा देण्याची इच्छा ठेवत असतील तर चांगली गोष्ट आहे. असे असले तरीही शालेय वयापासून खूप काळजी घेण्याची गरज नाही. यूपीएससीसाठी किमान वय २१ वर्षे आणि पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळकरी मुलांकडे पुरेसा वेळ असतो. यूपीएससी परीक्षेची तयारी आत्तापासून सुरू करू नका, फक्त तुमचा शालेय अभ्यास नीट करा, तुम्ही शाळेत एनसीईआरटीची पुस्तके नीट वाचलीत तर नंतर तयारी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. अशा अनेक गोष्टी शाळेतच शिकवल्या जातात, ज्याचा यूपीएससी परीक्षेत खूप उपयोग होतो. मराठीसह इतिहास, भूगोल, समाजशास्त्र याचा अभ्यास आवडीने करा. हे भविष्यात तुम्हाला खूप उपयोगी येईल.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टिप्स

आपल्याला पुढे जाऊन यूपीएससी द्यायची आहे, हे कॉलेज वयात असतानाच अनेकजण मनाशी पक्क करतात. पदवीपासूनच त्याची तयारी सुरू होते. ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही असे विषय घेऊ शकता जे दोघांसाठी फायदेशीर आहेत. उमेदवाराला यूपीएससी परीक्षेची तयारी गांभीर्याने करायची असेल, तर पदवीच्या शेवटच्या वर्षाकडे दुर्लक्ष करु नका. कॉलेज वयात मिळालेल्या वेळेचा फायदा करुन घ्या. विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हा.

UPSC परीक्षा आयोजन

दरवर्षी यूपीएससी परीक्षेचं आयोजन तीन टप्प्यात केलं जातं. परीक्षेत यश मिळवणे इतके सोप नाही तर त्यासाठी विशेष नियोजन आवश्यक आहे. मात्र, या परीक्षेची तयारी उमेदवार खूप मेहनत घेऊन करतात. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी उमेदवार त्यांच्या सामाजिक जीवनापासून दूर राहतात.

यूपीएससी परीक्षेत यश मिळवून तुम्हाला आयएएस अधिकारी किंवा आयपीएस अधिकारी बनायचे असेल, तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आयएएस आणि आयपीएस अधिकारी अत्यंत प्रतिष्ठित पद आहे. यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. UPSC परीक्षेची तयारी करताना उमेदवारांना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही UPSC परीक्षेला बसत असाल तर आणि तुम्हाला यश मिळवायचे असेल, तर तुम्ही या टिप्सच्या मदतीने तयारी करू शकता.

 

टिपा खालीलप्रमाणे आहेत

·       सर्वप्रथम उमेदवाराने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे.

·       यानंतर उमेदवार योग्य नियोजन करून तयारीला सुरुवात करू शकतात.

·       यूपीएससी परीक्षेची तयारी करताना वेगवेगळ्या प्रकाशकांची पुस्तके वाचल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो.

·       उमेदवार अभ्यासक्रमात सुधारणा करत राहतात.

·       परीक्षेची तयारी आणि अभ्यासक्रमासोबतच उमेदवारांनी लेखनाचा सरावही सुरू ठेवावा.

·       उमेदवार मॉक टेस्ट देखील सतत सोडवू शकतात.

 




By-- ORM

...Kshirsagar.


No comments:

Post a Comment

The Future of Jobs Report 2023

The Future of Jobs Report 2023 Title: The Future of Jobs Report 2023: Navigating the Changing Workforce Landscape   Introduction : The Futur...