Special Story | बारावीनंतर MPSC ची तयारी कशी करावी, पाहा
एमपीएससी ची तयारी
Ø
एमपीएससी - नवा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :
· पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास)
· पेपर- २ (गुण २०० - कालावधी २ तास)
एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने
नुकताच त्यांच्या पूर्व
परीक्षेचा पॅटर्न बदललाय. हा पॅटर्न ब-याच अंशी यूपीएससीसारखा आहे.
नवा अभ्यासक्रम आणि त्याचं
स्वरूप
नव्या पॅटर्ननुसार प्रीलियमसाठी
प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील.
पेपर- १ (गुण २०० - कालावधी २
तास)
- राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय
स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.
- भारताचा
इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
- महाराष्ट्र, भारत आणि
जगाचा भूगोल- भौतिक, सामाजिक आणि आर्थिक.
महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय
व्यवस्था , पंचायती
राज , शहरी
प्रशासन , शासकीय
धोरणं , हक्कविषयक
घडामोडी आदी
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत
विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक
मुद्दे , सामाजिक
धोरणं इ.पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता , हवामान
बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे , सामान्य विज्ञान
1) वस्तुनिष्ठ
माहिती - यामध्ये आकडेवारी, तारखा, कलमे, कायद्याच्या
अंमलबजावणीचे वर्ष,
व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल.
2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न
आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र
संबंधित संकल्पना समजून घ्या.
3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न
नुसताच नियम वा कायदा माहीती असणं महत्त्वाचं नाही तर त्याचं
विश्लेषण करता आलं पाहिजे.
4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या
अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा
आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासा. रोजचा पेपर वाचा. इतिहास , भूगोल , राज्य
शास्त्र , विज्ञान
यांच्या मूलभूत अभ्यासासाठी आठवी ते बारावीची पुस्तकं वाचा.
पेपर- २ (गुण २०० - कालावधी २
तास)
आकलन (कॉम्प्रिहेन्शन)
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)
- तर्कशुद्ध
युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल
अॅबिलिटी)
- निर्णय
क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)
- सामान्य
बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)
- बेसिक
न्यूमरसी , डेटा
इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)
- इंग्लिश
व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)
कॉम्प्रिहेन्शन :
यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उताऱ्यावर प्रश्न , पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं , वाक्यरचना ओळखणं , योग्य शब्दाची निवड करणं , समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात.
लॉजिकल रिझनिंग आणि अॅनॅलॅटिकल
अॅबिलिटी
यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची
क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध , त्यावरचं अनुमान काढावं लागंत.
डिसिजन
मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग :
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध
प्रश्नांना- समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून
योग्य , अधिकाधिक जनतेला
उपयोगी ठरेल , असा निर्णय घ्यावा
लागतो. प्रीलियमचे काही प्रश्न हे या क्षमतेची चाचपणी करणारे असतील.
जनरल मेंटल एबिलिटी :
आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या
घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ , काम , वेग , गुणोत्तर , कोडिंग , डिकोडिंग , प्रोबॅबिलिटी , घड्याळ , कॅलेंडर , दिशा आदींवर आधारित
प्रश्न असतात.
बेसिक न्यूमरसी आणि डेटा
इंटरप्रिटेशन :
यात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त
स्थानं भरणं , लसावि/ मसाविवर आधारित
प्रश्न , सरासरी , वयांचे गुणोत्तर नफा-तोटा , क्षेत्रफळ , आकारमान , प्रोबॅबिलिटी आदींवर
आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती , ग्राफ , टेबल्स याचं आकलन करणं अपेक्षित असतं. कॉम्प्रिहेन्शन तसंच न्यूमरसीचे प्रश्न
हे दहावीस्तराचे असणार आहेत , असंही जाहीर केलं गेलंय. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल.
इंटरपर्सनल स्किल्स
(कम्युनिकेशन स्किलसह) :
सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करत असताना अनेक व्यक्ती
, संस्था , राजकारणी , अधिकारी , कर्मचारी आदींशी
नियमित संपर्क येत असतो. त्यावेळी तुमची इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन
स्किल्स कामाला येतात.
By-- ORM
...Kshirsagar.
No comments:
Post a Comment