AEjuice

IAS अधिकारी व्हायचंय?

 IAS अधिकारी व्हायचंय?



 

 

IAS अधिकारी व्हायचंय? करा 'ही' तयारी

भारतीय नागरी सेवेंतर्गत आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केली जाते. ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आयएएस अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. त्या पदाच्या वर केवळ मंत्री असतात. भारतात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेंतर्गत केवळ तीन पदांची भरती होते ज्यात IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

नागरी सेवा परीक्षेत (यूपीएससी) टॉप रँकने यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची निवड आयएएस अधिकारी पदासाठी होते. त्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी असते. या परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी असते.

 

कशी कराल IAS ची तयारी?

ü  यूपीएससी परीक्षा देण्यासाठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे आहे. या परीक्षेची तयारी करायची असेल तर ती या वयापासूनच करावी. कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३२ वर्षं असून उमेदवार जास्तीत जास्त वेळा ही परीक्षा देऊ शकतो.

ü   दहावीनंतरच या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. यूपीएससीच्या तयारीसाठी अनेक खासगी तसेच शासकीय संस्थाही कार्यरत आहेत.

ü  दररोजचे वर्तमानपत्र आणि नियतकालिक वाचणं अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते.

ü  दहावीनंतर असा विषय निवडा, ज्यात तुम्हाला रस आहे आणि हाच विषय तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी निवडू शकाल. पसंतीचा विषय आधीच ठरल्याने तुम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल

ü  यूपीएससी परीक्षेत एकूण २५ विषयांमधून आपल्याला विषय निवडायचा असतो. तोच विषय निवडा, जो तुम्हाला अभ्यासायला सोपा जाईल.

ü  वेळेचे योग्य नियोजन करा. एक रुटीन तयार करा आणि त्याप्रमाणे तयारी करा. अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका.

आयएएस अधिकाऱ्याची कामे

सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करणे आणि त्यांचे पालन करणे हे प्रामुख्याने आयएएसचं काम असतं. जिल्ह्यात आयएएस जिल्हा दंडाधिकारी, जिल्हाधिकारी किंवा आयुक्त असू शकतो. याव्यतिरिक्त बढतीनंतर कॅबिनेट सचिव, सहसचिव, अवर सचिव, उपसचिव आदि पदेही मिळतात. भारतीय नोकरशाहीत सर्वोच्च पद कॅबिनेट सचिवचं असतं, जो संसदेलाही उत्तरदायी असतो.

याव्यतिरिक्त आयएएस ऑफिसरची सरकारच्या विविध विभागांवर, कंपन्यांमध्ये महामंडळांमध्ये प्रमुखपदी नियुक्ती होते. उदाहरणार्थ, एमएमआरडीए, म्हाडा इत्यादी.

 

 

IAS Officer होण्याचं स्वप्नं बघताय? ही शैक्षणिक पात्रता आवश्यक; किती मिळतो पगार? वाचा

ही देशातील सर्वात मोठी सरकारी नोकरी आहे. IAS अधिकारी एक प्रभावी व्यक्ती असतो. हा अधिकारी सर्व विभागांना मार्गदर्शन करतो की कोणत्या विभागात कसं काम करावं. केंद्र सरकारचे सर्व सचिव आयएएस अधिकारी आहेत. केवळ एक IAS अधिकारी सर्व विभागांमध्ये सरकारी धोरणे लागू करतो. राष्ट्रपती आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करतात. म्हणूनच या अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकारी असेही म्हटलं जातं. राज्य सरकार IAS अधिकाऱ्याला निलंबित करू शकते पण त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो.

ही पात्रता असणं आवश्यक :-  यूपीएससी परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता

 

यूपीएससी परीक्षा देणारा विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. मुक्त विद्यापीठातील पदवी सुद्धा यासाठी ग्राह्य मानली जाते. पदवी ही किमान पात्रता  आहे सर्वोच्च पात्रता काहीही असू शकते.  

 

IAS अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतून पदवीधर असणं फार महत्वाचं आहे. सामान्य श्रेणीतील विद्यार्थी IAS परीक्षेसाठी 21 ते 32 वर्षांपर्यंत कोणत्याही वेळी 6 वेळा परीक्षा देऊ शकतात. ओबीसी विद्यार्थी ही परीक्षा 21 ते 35 वर्षांपर्यंत 9 वेळा देऊ शकतात. त्याच वेळी, SC आणि ST श्रेणीचे विद्यार्थी IAS परीक्षेसाठी वयाच्या 21 ते 37 वर्षांच्या वयात हव्या तेवढ्या वेळा परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे  भारत, नेपाळ किंवा भूतानचं नागरिक असणे अत्यंत महत्वाचं आहे. IAS होण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 परीक्षा द्याव्या लागतात. यातील पहिला प्रारंभिक परीक्षा, दुसरा मुख्य परीक्षा आणि तिसरा विभाग मुलाखत असतो.

यूपीएससी परीक्षेसाठी शुल्क किती असतो?

 पूर्व परीक्षेसाठी शंभर रुपये व मुख्य परीक्षेसाठी दोनशे रुपये असे शुल्क परीक्षेसाठी युपीएससी आकारत असते.

यूपीएससी परीक्षेचे स्वरूप

यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होत असते.  परीक्षेचा पहिला टप्पा पूर्व परीक्षेचा असतो.  पूर्वपरीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षा आयोजित केली जाते.  तिसऱ्या व अंतिम टप्प्यावर ती मुलाखत कार्यक्रम असतो.

 

पूर्व परीक्षा-

पूर्व परीक्षेमध्ये हे दोन पेपर असतात.पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात.  नकारात्मक गुणदान योजना लागू आहे.

पेपर 1 – 100 गुणांसाठी असतो. पेपर 1 मध्ये सामान्यज्ञान व चालू घडामोडी विषयक प्रश्नांचा समावेश असतो.

 पेपर 2 – 80 गुणांसाठी असतो. Civil Service Aptitude Test (CSAT)असे या पेपरचे नाव आहे.

 

क्रमांक

पेपर

प्रश्न संख्या

अधिक तम गुण

वेळ

टीप

1

सामान्य ज्ञान General study (GS)

100

200 (प्रत्येक प्रश्नाला दोन गुण)

दोन तास

गुणवत्ता यादी साठी गुण ग्राह्य धरले जातात.

2

CSAT (Civil Service Aptitude Test)

80

200 (प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण)

दोन तास

फक्त पात्रता पेपर. (66  गुण मिळाल्यास पात्र)

 

मुख्य परीक्षा

पूर्व परीक्षेत उमेदवारांना मिळणाऱ्या गुणांच्या आधारेमुख्य परीक्षेचे आयोजन केले जाते. 

पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो मुख्य परीक्षेमध्ये एकूण नऊ पेपर असतात सर्व पेपर वर्णनात्मक असतात.  नऊ मधील भाषाविषयक दोन पेपर असतात. इंग्रजी भाषा व एक प्रादेशिक भाषा.  300 अधिक 300 गुणांचे हे भाषा विषय परीक्षा असते.  भाषा विषयाच्या पेपर मध्ये मिळणारे गुण मेरीट साठी गणले जात नाहीत.  म्हणजे हे फक्त पात्रता पेपर आहेत.

 यूपीएससी परीक्षेची गुणवत्ता यादी मुख्य सात लेखी पेपर वरती आधारित असते. सातही पेपर प्रत्येकी 250 गुणांचे असे एकूण सतराशे पन्नास गुणांचे असतात. 

 

क्र.

पेपर

पेपरचे नाव

मिळणारे अधिकतम गुण

1

पेपर 1

निबंध लेखन

250

2

पेपर 2

सामान्य ज्ञान 1

250

3

पेपर 3

सामान्य ज्ञान 2

250

4

पेपर 4

सामान्य ज्ञान 3

250

5

पेपर 5

सामान्य ज्ञान 4

250

6

पेपर 6

वैकल्पिक विषय पेपर 1

250

7

पेपर 7

वैकल्पिक विषय  पेपर 2

250

8

9

लेखी परीक्षेचे एकूण गुण

1750

10

मुलाखतीसाठी गुण

275

एकूण गुण 

2025

 

अशाप्रकारे मुख्यपरीक्षा सतराशे पन्नास गुणांसाठी होते. 1750 गुणांपैकी गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

 गुणवत्ता यादी नुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवार ठरवले जातात.  पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.

युपीएससी मुलाखत 

 यूपीएससी परीक्षेची मुलाखत 275 गुणांची असते.  मुलाखत देशाच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजे नवी दिल्ली येथे घेतली जाते.  मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांची एकत्रित गुणानुक्रमे यादी जाहीर केली जाते. आणि जेवढ्या जागांसाठी यु पी एस सी परीक्षा जाहीर केली होती तितक्यात जागा गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या माध्यमातून भरली जातात. 

योग्य मार्गदर्शन, प्रभावी अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव या आधारे परीक्षा एक मराठी विद्यार्थी सुद्धा सहजतेने पास होऊ शकतो.  जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षेच्या आधारे परीक्षेला सामोरे जा. 


इतका मिळेल पगार


IAS अधिकाऱ्याचं वेतन वेगवेगळ्या निकषांच्या आधारे ठरवलं जातं. तरीही 60 हजार रुपयांपासून ते 2.5 लाख रुपयांपर्यंत इतकं वेतन IAS अधिकाऱ्यांना मिळतं. याशिवाय या अधिकाऱ्यांना अनेक भत्ते स्वतंत्रपणे दिले जातात.

UPSC भारतीय प्रशासन व्यवस्था चालवण्यासाठी उत्तम प्रशासकांची गरज असते.  उत्तम प्रशासकांची निवड करण्यासाठी लोकसेवा आयोग कार्यरत आहेत.  सनदी सेवकांची नेमणूक लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत असते. राज्य पातळीवर ती राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय पातळीवर ती संघ लोकसेवा आयोग कार्यरत असतो.  सनदी  सेवक म्हणून उत्तम प्रशासक निवडीसाठी आयोग विविध परीक्षा घेत असते.  योग्य उमेदवार व सक्षम प्रशासक निवडण्यासाठी तितकीच कार्यक्षम परिक्षा घ्यावी लागते.  या परीक्षांचे नियोजन राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग करत असतात.

 




By-- ORM

...Kshirsagar.


No comments:

Post a Comment

The Future of Jobs Report 2023

The Future of Jobs Report 2023 Title: The Future of Jobs Report 2023: Navigating the Changing Workforce Landscape   Introduction : The Futur...